नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण नवीन वाणी खरेदी करीत असतात, याच नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या नवीन बाईक लॉन्च करीत असतात. जर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षामध्ये बाईक खरेदी करायची असेल, आणि त्यामध्ये जर तुम्हाला रॉयल एनफिल्ड खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत.
मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये Royal Enfield ग्राहकांसाठी नवीन मॉडेल घेऊन येत आहे. सांगायचे झाली तर कंपनी नवीन वर्षामध्ये Shotgun 650 ही बाईक लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या या बाईकची किंमत Meteor 650 पेक्षाही कमी असल्याचे बोलले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया फीचर्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.
Contents
फक्त 25 युनिट होणार सादर
मिळालेल्या माहितीनुसार कंपनी या बाईकची फक्त 25 युनिटची प्रोडक्शन केले जाणार आहे, या बाईकची किंमत 4.25 लाख रुपये इतकी ठेवली जाणार आहे. या बाईकची डिलिव्हरी जानेवारी 2024 पासून सुरू केली जाणार आहे. जागतिक स्तरावर फक्त 25 जणांना या बाईकची मालकी गाजवता येईल. 650 सीसी सेगमेंट मधील रॉयल एनफिल्ड ची ही बाईक त्यांच्या लाईन वाढविण्यात कंपनीला मदत करीन.
Royal Enfield Shotgun 650 इंजिन
या बाईक मध्ये 648cc पॅरलल-ट्विन, ऑइल-कूल्ड दिले गेले आहे, हे इंजिन 7,250rpm वर 46.40bhp जास्तीची पॉवर आणि 5,650rpm वर 52.3Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा गिअर बॉक्स सहज जोडलेली असू शकते. या बाईकचे एकूण वजन 240 किलोग्रॅम इतके राहणार आहे. मायलेज बद्दल बोलायचे झाले तर याचे सर्टिफाइड रेंज 22 kmpl इतके बोलले जात आहे.
Royal Enfield Shotgun 650 डिझाईन
Royal Enfield Shotgun 650 या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर ही बाईक बाबर स्टाईल बाईक आहे, या बायकची लांबी 2170mm, रुंदी 820 mm आणि उंची 1105 mm इतकी आहे. या बाईक चा व्हील बेस 1465mm आणि ग्राउंड क्लिअरन्स 140mm इतका आहे. या बाईकचे एकूण वजन 240 केजी इतके असून यामध्ये 13.8 लिटर क्षमतेचा इंधन टाकी देण्यात आली आहे.
Shotgun 650 फीचर्स
Shotgun 650 या बाईकच्या फीचर्स लिस्टमध्ये बाबर स्टाइल फीचर्स देण्यात आले आहेत, यामध्ये तुम्हाला राऊंड हेडलाईट, बुलेट स्टाइल टर्न इंडिकेटर, सिंगल पीस सीट आणि ड्युअल पी-शूटर एक्झॉस्ट मिळतात. नवीन Shotgun 650 मध्ये संपूर्ण एलईडी लाईट, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि साइड-स्टँड कट-ऑफ अशा सुविधा दिल्या जातात. ही नवीन बाईक बाजारामध्ये चार कलर ऑप्शन मध्ये सादर होईल.
ब्रेकिंग साठी या बाईक मध्ये ड्युअल-चॅनल एबीएससह सिंगल फ्रंट आणि रियर डिस्क देण्यात आली आहे. समोरच्या बाजूला 100/90-18 टायर आणि च्या बाजूला 150/70 R17 टायर सेटअप दिला गेला आहे.
हे पण वाचा – Redmi Note 13 Series Launching : पुढच्या आठवड्यात धडकणार ही शानदार सिरीज, 120 W चार्जर आणि बरेच फीचर्स
Shotgun 650 किंमत
Royal Enfield जानेवारी 2024 मध्ये Shotgun 650 भारतात लॉन्च करणार आहे, 650cc प्लॅटफॉर्मवर कंपनीची ही चौथी बाईक असेल. मिळालेल्या माहितीनुसार Super Meteor 650 पेक्षा कमी किंमत असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार लॉन्चिंग नंतर या बाईकची किंमत 3.60 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवली जाऊ शकते.
Nokia Alpha 2023 : हा आहे नोकिया चा सर्वात स्लिम स्मार्टफोन, यामध्ये मिळत आहे 8900mah बॅटरी