चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo न भारतात यावर्षी जुलैमध्ये Reno 10 ही सिरीज लॉन्च केली होती. या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत उच्च दर्जा प्राप्त केला आहे. ही कंपनी स्मार्टफोन प्रेमींना पुरेसे तेवढे फीचर्स लो बजेट सेगमेंटमध्ये त्यांच्या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करून देते. या स्मार्टफोन कंपनीने मागील काही काळामध्ये भारतीय बाजारपेठेत खूपच वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या स्मार्टफोन कंपनीने Reno 10 ही सिरीज लॉन्च करताच, लागलीच Reno 10 Pro 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन आता कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवर आणि त्यासोबतच काही ई-कॉमर्स वेबसाईटवर 37,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.
Contents
Oppo Reno 10 Pro 5G फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी बोलायचे झाले तर. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ आणि AMOLED 3d कव्हर डिस्प्ले दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 120HZ रिफ्रेश रेट आणि 1080 x 2412 पिक्सल रेझोल्युशन सह येतो. या स्मार्टफोनचा टच सॅम्पलिंग रेट 240HZ एवढा आहे. हा स्मार्टफोन जवळपास 185 ग्राम एवढ्या वजनाचा आहे.
Android 13 सॉफ्टवेअर वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर सह Snapdragon 778G 5G हा चीफ सेट देण्यात आला आहे, ज्यामुळे आपल्याला खूपच तर तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आले आहे.
या स्मार्टफोनच्या स्टोरीज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन हाताळताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
Oppo Reno 10 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल+ 32 मेगापिक्सल+ मेगापिक्सल असा मल्टी डायमेन्शनल रियल सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे .यामध्ये एलईडी फ्लॅशची समावेश आहे, ज्यामुळे फोटोग्राफी करताना आपल्याला अतिशय तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोनमध्ये सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4600mAH ची बॅटरी आणि 80W चार्जर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Silvery Grey, Glossy Purple या दोन कलर ऑप्शन मध्ये पहायला मिळणार आहे, हे दोन्ही कलर ऑप्शन फारच मनमोहक आहेत.
हे पण वाचा – Vivo Y100i power भारतीय बाजारपेठेत होणार लॉन्च, बॅटरी बॅकअप पाहून वाल दंग
Oppo Reno 10 Pro 5G किंमत
या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, एवढे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहता हा स्मार्टफोन खूपच नो बजेट सेगमेंट मध्ये आहे. या स्मार्टफोनची किंमत 35,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तगडे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असलेला हा स्मार्टफोन, तुमच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय करू शकतो.
2023 मधील हे ‘5’ प्रीमियम स्मार्टफोन एकदा पहाच, iphone ला देत आहेत टक्कर