भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या दमदार फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी सह लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर दमदार डिस्काउंट देत आहेत. त्यापैकीच एक MOTOROLA या स्मार्टफोन कंपनीने नुकताच लॉन्च केलेला Moto G60 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच धुमाकूळ घालत होता. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने खूपच तगडे फीचर्स आणि दमदार अशी कॅमेरा क्वालिटी दिली असल्यामुळे, ह्या स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन युजर च्या मनावर छाप पडली आहे.
तसेच अनेक स्मार्टफोन कंपन्या डिस्काउंट देत आहेत, तसेच या स्मार्टफोन कंपनीने देखील या स्मार्टफोनवर भव्यअसा डिस्काउंट स्मार्टफोन खरेदीवर ठेवला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि डिस्काउंट बद्दल अधिक माहिती.
Contents
MOTOROLA Moto G60 फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.8 हिंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 225g वजनासह येतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 1080 x 2460 एवढ्या पिक्सल रिझर्वेशन ला सपोर्ट करतो. Android 11 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM7150 Snapdragon 732G हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 4GB RAM, 128GB 6GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
MOTOROLA Moto G60 कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6000mAH ची बॅटरी 20W चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे.
हे पण वाचा – Samsung Galaxy M55 हा स्मार्टफोन केव्हाही होऊ शकतो लॉन्च, यूजर्स पाहात आहेत या स्मार्टफोनची आतुरतेने वाट
MOTOROLA Moto G60 किंमत
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यावर ची किंमत 21,999 रुपये एवढी ठेवली गेली होती. परंतु प्रजासत्ताक दिनानिमित्त च्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत तब्बल 7,000 रुपयांनी उतरली आहे. आता सध्या हा स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये मिळत आहे.
त्यावरही Axis Bank च्या कार्डवर खरेदी केल्यानंतर 5% चा अधिक कॅशबॅक दिला जाणार आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो, आणि आता हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये देखील आहे.
Samsung Galaxy F54 5G : या ‘5G’ स्मार्टफोनवर मिळत आहे थेट 11,000 रुपये डिस्काउंट