Kawasaki ने अखेर त्यांची Kawasaki Ninja ZX-6 ही बाई एक भारतामध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईची किंमत 11.09 लाख रुपये ठेवले आहे. ही बाई जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारतामध्ये डिलिव्हरी केली जाईल. ही बाई संपूर्णपणे CBU अंतर्गत देशांमध्ये आयात केलेली मॉडेल म्हणून लॉन्च केली आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इंडिया बाईक विक या कार्यक्रमांमध्ये कंपनीची Kawasaki Ninja ZX-6 बाईक सादर करण्यात आली होती.
सध्या ही बाइक सिंगल व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. लाइम ग्रीन आणि मेटॅलिक ग्रेफाइट या दोन कलर ऑप्शन मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. अधिक शक्तिशाली इंजिन, आकर्षक डिझाईन आणि आधुनिक अपडेटसह ही स्पोर्ट बाईक भारतीय बाजारपेठ मध्ये उतरवली आहे.
Contents
Kawasaki Ninja ZX-6R डिझाईन
या बाईचे डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर याची डिझाईन Kawasaki चे पूर्वीचे मॉडेल ZX-10R प्रमाणे आहे. यामध्ये तुम्हाला ड्युअल LED हेडलॅम्प सेटअप आणि सिग्नेचर सुपरस्पोर्ट स्टाइल देण्यात आला आहे. याच्या व्हिज्युअल हायलाइट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात स्प्लिट सीट्स, फ्लोटिंग टेल सेक्शन, मस्क्यूलर फ्युएल टँक आणि अपस्वेप्ट ड्युअल-बॅरल एक्झॉस्ट कॅनिस्टर देण्यात आले आहेत.
Kawasaki Ninja ZX-6R इंजिन
ZX-6R मध्ये BS6 कंप्लायंट, 636cc, इनलाइन-फोर इंजिन आहे जे 128bhp आणि 69Nm पॉवर निर्माण करते. याचा पावर इनटेक 127BHP पर्यंत वाढवला जाऊ शकतो. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे त्यासोबतच यामध्ये स्लीप आणि असिस्ट क्लच आणि एक बाय डायरेक्शनल गेअर शिफ्ट दिला आहे.
ZX-6R सस्पेन्शन आणि ब्रेकिंग
बाईक समोरच्या बाजूला Showa Big Piston Forks आणि मागच्या बाजूला शोवा मोनो-शॉकऑब्झर्वर देण्यात आले आहेत. यात अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, बाईकची दोन्ही चाके Pirelli Diablo Rosso™ IV टायरने झाकलेली आहेत.
बाईकच्या ब्रेकिंग बद्दल बोलायचे झाले तर, बाईकमध्ये 320 मिमी डबल Discआहेत ज्यात पुढील बाजूस निसिन 4-पिस्टन कॅलिपर आणि मागील बाजूस 220 मिमी डिस्क ब्रेक आहेत. ड्युअल-चॅनल ABS देखील डिस्क ब्रेकशी संबंधित आहे. सीटची उंची 830 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 130 मिमी असल्याचे सांगितले जात आहे.
Ninja ZX-6R फीचर्स
या बाईच्या फीचर्स लिस्ट मध्ये असिस्ट-आणि-स्लिपर क्लच, LED इंडिकेटर आणि प्रगत सस्पेन्शन सिस्टम आहे, ज्यामध्ये शोवा SFF-BP फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉकचा समावेश आहे. तीन मोडसह ट्रॅक्शन कंट्रोल, कावासाकी इंटेलिजेंट अँटी-लॉक ब्रेक सिस्टम आणि पॉवर मोड्स बाईकच्या इलेक्ट्रॉनिक आर्सेनलमध्ये अत्याधुनिकतेचा पुरावा देतात. 4.3-इंचाचा TFT डिस्प्ले दिला आहे ज्यामुळे रायडरला नेविगेशन, आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सोबत बरेच फीचर्स पाहायला मिळतात.
हे पण वाचा – Infinix Smart 8 हा स्मार्टफोन उडवतोय भारतीय बाजारपेठेत धुरळा, फीचर्स ही दमदार
Kawasaki Ninja ZX-6R किंमत
रु. 11.09 लाख (एक्स शोरूम प्राईज) किंमतीसह, ZX-6R ही बाईक बाजारामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. BS-VI च्या आधीच्या काळाच्या तुलनेत रु. 60,000 ची वाढ असूनही, कावासाकीच्या लाइन-अपमध्ये Z900 आणि Ninja 1000 SX मधील बाईक यांच्याशी स्पर्धा करते.
OnePlus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, फीचर्स बद्दल माहिती झाली लिक