भारतीय बाजारपेठेत सध्या Apple या स्मार्टफोन कंपनीच्या Iphone या स्मार्टफोनची खूपच क्रेझ वाढली आहे. सर्व स्मार्टफोन प्रेमींना असे वाटत आहे की आपल्याकडे सुद्धा iphone 15 किंवा Iphone 14 या सिरीज मधील स्मार्टफोन आपल्याकडे असावा. परंतु या स्मार्टफोनच्या किमती पाहिल्यावर बऱ्याच स्मार्टफोन प्रेमींचे हा स्मार्टफोन विकत घेण्याचे स्वप्न स्वप्न जाऊन राहते. जर तुम्हाला सुद्धा या स्मार्टफोन कंपनीचा iphone 15 हा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच महत्वाचे ठरू शकते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या सेलमध्ये ह्या स्मार्टफोनवर खूपच तगडा असा डिस्काउंट सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि या स्मार्टफोनवरील डिस्काउंट किंमत आणि ऑफर्स.
iphone 15 फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, आपल्याला या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेशमेंट आणि 2000 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1290 x 2796 एवढ्या पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. iOS 17 सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Hexa-core प्रोसेसर आणि Apple A17 Pro हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 8GB RAM, 512GB 8GB RAM, 1TB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन व्हेरिएंट पाहायला मिळतात. डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये Ceramic Shield glass हा ग्लास दिला आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनला कुठलीही दुखापत होणार नाही.
iphone 15 कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी खूपच तगडा असा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल असा सेटअप आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी खूपच तगडी असल्यामुळे स्मार्टफोन युजर्स खूपच आकर्षित होतात. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 4441mAH ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे.
iphone 15 किंमत
या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन लॉन्च झाला होता तेव्हा या स्मार्टफोनची किंमत तब्बल 80,000 रुपये एवढी होती. जर तुम्हाला सुद्धा iphone 15 घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वरच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त च्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत केवळ 66,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे.
परंतु जर तुमच्याकडे ICICI BANK चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला यावरही 5,000 रुपयांची अधिक सूट मिळू शकते. जर तुम्ही सुद्धा हा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच लाभदायक ठरेल.