भारतीत स्मार्टफोन निर्माता कंपनी TECNO ने नवीन वर्षात आपल्या युजरसाठी एक मोठी बेट आणली आहे. या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लॉन्च केला, आहे या स्मार्टफोनचे नाव Tecno spark 20 pro आहे. या स्मार्टफोन ने भारतीय बाजारपेठेत खूपच धुमाकूळ घातला आहे. स्मार्टफोन प्रेमींसाठी असलेल्या लोकांमध्ये या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये चर्चेचा विषय बनला आहे. या स्मार्टफोन कंपनीने नोव्हेंबर महिन्यात spark 20 सिरीज लॉन्च केली होती.
या स्मार्टफोनमध्ये नवीन आणि तगडे फीचर्स दिले गेले आहेत, आणि हा स्मार्टफोन वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे ह्या स्मार्टफोनची मागणी भारतीय बाजारपेठेत खूपच वाढली आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज पाहायला मिळतो.चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.
Contents
Tecno spark 20 pro फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेशट आणि 1080 x 2460 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 13 आधारित या स्मार्टफोनमध्ये Mediatek Helio G99 हा जीप सेट दिला गेला आहे. हा स्मार्टफोन Octa-core प्रोसेसर सह येतो. हा स्मार्टफोन आपल्याला Moonlit Black, Frosty Ivory, Sunset Blush, Magic Skin या चार कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे,
हे सर्व कलर ऑप्शन मुळे स्मार्टफोनचा लुक खूपच मनमोहक आहे. या स्मार्टफोन मध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोन संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.
Tecno spark 20 pro कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 108 मेगापिक्सल चा आणि 0.08 मेगापिक्सल चा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, त्यासोबतच एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रेंड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
अतिशय सुंदर अशा कॅमेरा सेटअप मुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच आनंद घेता येईल. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी 33W चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.
हे पण वाचा – Royal Enfield Classic 650 : टेस्टिंग दरम्यान नजरेस आली ही पावरफुल बाईक, लवकरच येणार बाजारात
Tecno spark 20 pro किंमत
Tecno या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन युजरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले होते. नुकताच लॉन्च झालेला Tecno spark 20 pro हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत किंमत 12,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे.
Moto G34 5G : 9 जानेवारीला भारतीय बाजारपेठेत धडकणार हा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन