भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन फ्लॅग शिप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. हे स्मार्टफोन दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतात. भारतीय बाजारपेठेत सॅमसंग या स्मार्टफोन कंपनीचे त्यांचा fold होणारा मोबाईल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला होता. या स्मार्टफोनला भरपूर प्रतिसाद स्मार्टफोन प्रेमींनी दिला होता. तसेच सॅमसंग नव्हे तर Tecno ही स्मार्टफोन कंपनी सुद्धा आता Fold होणार स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
या स्मार्टफोनचे नाव Tecno Phantom V2 Fold असे आहे. हा स्मार्टफोन 12GB रॅम सह भारतीय बाजारपेठेत येऊ शकतो. या स्मार्टफोनची स्मार्टफोन्स प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स , स्पेसिफिकेशन्स आणि किमती विषयी अधिक माहिती.
Contents
Tecno Phantom V2 Fold फीचर्स
या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 7.87 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेशमेंट आणि 2000 x 2296 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android v13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa core प्रोसेसर आणि MediaTek Dimensity 9300 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 12GB रॅम असेल एवढा स्टोरेज पाहायला मिळू शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Tecno Phantom V2 Fold कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सेल+ 32 मेगापिक्सल असा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा अतिशय सुंदर आनंद घेता येईल.
एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 32+32 मेगापिक्सेलचा Dual कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप चा विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5000mAH ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते.
हे पण वाचा – Oneplus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येऊन घालणार धुमाकूळ, इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत
Tecno Phantom V2 Fold किंमत
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत अंदाजे किंमत 88,960 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती विषयी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.
जर तुम्हाला सुद्धा असा दमदार आणि आकर्षक स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो हा स्मार्टफोन 2024 मध्ये एप्रिल या महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो.
Vivo G2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आला, आणि भल्याभल्या स्मार्टफोनचा धुरळा उडवला