मागील काळामध्ये ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी स्मार्टफोन उत्पादक कंपनी Nothing त्यांचा नवीन स्मार्टफोन Nothing Phone 2a हा घेऊन येत आहेत, Nothing कंपनी ट्रान्सपरंट फोन बनवण्याच्या रस्त्यावर आहे. या स्मार्टफोनची माहिती सोशल मीडियावर झाली आहे. Nothing Phone 2a ही कंपनी स्वस्त स्मार्टफोन आणायची तयारी करत आहे. जर तुम्ही स्वस्त स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तरतुम्हाला ही सुवर्णसंधी असेल.
Nothing Phone 2a या स्मार्टफोन मध्ये50 मेगा पिक्सेल प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे त्यासोबतच 8 जीबी रॅम उपलब्ध करून दिला जातो. तर चला मग जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.
Nothing Phone 2a फीचर्स
Nothing Phone 2a या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिलेला आहे, हा डिस्प्ले 120Hz फ्रेश रेट सपोर्ट सह दिला गेलेला आहे. हा डिस्प्ले 700 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करणारा दिला जाऊ शकतो. Android 14 वर आधारित असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 SoC चीप सेट दिला जाऊ शकतो, ज्यामुळे यामध्ये तुम्हाला तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 8GB रॅम आणि128 GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
Nothing Phone 2a कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सल दोन प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला गेलेला आहे, यासोबतच एलईडी फ्लॅश चा ही समावेश आहे.
विशेष म्हणजे ह्यावेळी कॅमेऱ्याची भोवती Glyph LED आहेत, ज्या जुन्या दोन्ही मॉडेल्स मध्ये देण्यात आल्या होत्या. ह्या एलईडी लाइट्स अॅप नोटिफिकेशनना सपोर्ट करतील.या स्मार्टफोनमध्ये 4500mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोबाईलला फास्ट चार्जिंग साठी USB Type-C पोर्ट मिळतो.
हे पण वाचा – Poco M6 5G Launching : 22 डिसेंबरला हा बजेट स्मार्टफोन धडकणार, पहा फीचर्स आणि डिझाईन
Nothing Phone 2a
सोशल मीडिया वेबसाईट X एक्स वर व्हायरल झालेल्या एका पोस्ट नुसार Nothing Phone 2a हा स्मार्टफोन 2024 वर्षाच्या सुरुवाती महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला जाऊ शकतो. 2024 मध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ड कॉंग्रेस मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. त्यानंतर या पोस्टमध्ये असा दावा केला गेला आहे, या स्मार्टफोनची किंमत 400 डॉलर असू शकते जी भारतीय किमतीमध्ये 33,200 रुपये असू शकते.
Google Pixel 8 स्मार्टफोन खरेदीवर 16000 रुपये सूट, 31 डिसेंबर पर्यंत संधीचा लाभ घेता येणार