नवीन हळद बाजार समितीत दाखल होताच चांगलाच भाव खात आहे.रिसोड बाजार समितीत १४ मार्चपासून खरेदीला सुरुवात झाली असून विक्रमी भाव मिळाला आहे.खरीप हंगामातील नवीन हळद काढून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आली असता पहिल्याच दिवशी चांगला भाव मिळाला वाशीम च्या रिसोड कृषी उत्त्पन्न बाहेर समितीच्या नव्या हळदीला १७ हजार रुपय प्रति दर मिळाला आहे.
हळद खरेदीसाठी वाशीम जिल्ह्यात असलेल्या रिसोड उत्त्पन बाजार समितीमध्ये आजपासून हळद खरेदीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली आहे असून पहिल्या दिवशी हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना शेला-टोपी देऊन आमदार झनक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाजार भाव:
नव्या हळदीला आज १७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर तीन हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत दर गुरुवार,शनिवारी हळद खरेदी केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी चांगले दर मिळाल्यान शेतकऱ्यांचा अपेक्षा उंचावल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हळद खरेदी केली जात नव्हती. आता वाशिम आणि रिसोड बाजार समितीत हळद खरेदी केली जात आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात हळद विक्रीसाठी न्यायचं काम नाही आहे. त्यातच दोन्ही बाजार समितीमध्ये हळदीला चांगला भाव मिळत असल्याने इतर जिल्ह्यातील हळद या बाजार समितीत विक्रीसाठी आणली जात आहे.
नवीन हळद बाजारात येताच हळदीला चांगला भाव मिळत आहे आगामी काळात हळदीला अधिक चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.