कांदा निर्यातबंदीचे परिणाम!शेतकऱ्यांना एकरी 3 लाखाचा फटका, देशाचे कोटींचे नुकसान..

महाराष्ट्राला १,१७३ कोटींचा तर शेतकऱ्याला एकरी ३ लाखाचा फटका.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचे धोरण लादले आणि महाराष्ट्रात ऐन लोकसभेच्या निवडणुकांच्या काळात गदारोळ उडाला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या निर्यातबंदीचा फटका जर पाहिला तर हा आकडा कैक कोटींमध्ये आहे.

या धोरणामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील ६ लाख ९४ हजार ९२९ मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यातून तब्बल १,१७३ कोटींचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

आता शेतकऱ्यांच्या बाजूने पाहिले तर निर्यातबंदीमुळे देशांतर्गत भाव निम्म्यावर आले होते त्यामुळे या वर्षातील दोन हंगामात प्रतिएकरी तीन लाखांचा फटका बळीराजाला बसला आहे.

६० देशांत होते कांदा निर्यात

Contents

भारतातून जगभरातील तब्बल ६० पेक्षा जास्त देशांत कांदा नेला जातो. यात एकंदरीत महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के आहे. परंतु यंदाच्या निर्यातीवर शुल्क लावणे, तसेच निर्यातबंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून १,८७५ कोटींवर आली असून गतवर्षीच्या तुलनेत राज्याची निर्यातीमधील उलाढाल १,१०० कोटींनी कमी झाल्याची माहिती सध्या एका मीडियाने दिली आहे.

निर्यातबंदी काळात केंद्र सरकारची कंपनी मात्र मालामाल
केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्यावर निर्यातबंदी लावली व ३१ मार्च २०२४ पूर्वीच मुदतवाढ दिली होती. एनसीईएलच्या माध्यमातून १७ फेब्रुवारीपासून कांदा निर्यातीचा निर्णय घेतला. एनसीईएलने दोन अडीच महिन्यांच्या कालावधीत २०० टन कांदा निर्यात केला व यातून साधारण तिप्पट नफा कमावला असल्याचे सांगितले जाते.

कंपनीने अडीच महिन्यांत जवळपास साडेचार हजार मेट्रिक टन कांदा दुबईत व १,६५० मेट्रिक टन बांगलादेशात निर्यात केला. हा कांदा ऑनलाइन निविदाद्वारे विशिष्ट कंपनीच्या माध्यमातून खरेदी केला.

कंपनीने कमी दराचा कांदा घेतला व अधिक दराने एनसीईएलला विकला. एनसीईएल याच कांद्याची ऑनलाइन निविदाद्वारे अधिक दराने विक्री केली.एनसीईएलने अडीच महिन्यांत ७० ते ८० कोटी रुपये नफा कमवला.

देशाचे जवळपास साडेसहाशे कोटींचे नुकसान
वर्षभराचा विचार केला तर देशातून ८ लाख १७ हजार टन कांदा निर्यात कमी झाल्याने ६४९ कोटी रुपयांचा फटका देशाला बसला असल्याचे बोलले जाते.

हे पहायला विसरू नका: https://www.infointohindi.com/%e0%a4%ab%e0%a4%b3%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2/